‘InPsych 2023’ Organized by the Department of Psychology, SSPU
मानसशास्त्र विभागाकडून ‘इनसाईक २०२३’ चे आयोजन
डॉ.कल्पना श्रीवास्तव यांचे सकारात्मक मानसिक स्वास्थ या विषयावर भाषण
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातर्फे २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘इनसाईक २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रात काम करणारे मानसशास्त्राचे अभ्यासक व विषयाशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधला जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.राजेंद्र म्हस्के म्हणाले, विभागाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे उद्घाटन २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी डॉ.कल्पना श्रीवास्तव यांचे सकारात्मक मानसिक स्वास्थ या विषयावर भाषण होईल. अभिनेत्री गिरिजा ओक, क्रीडा मानसशास्त्रज्ञ गायत्री वर्तक, ट्रॉमा अँड एक्स्प्रेसिव आर्ट थेरपी विषयातील अनुप्रिया बॅनर्जी, अँनिमल असिस्टेड थेरपी या विषयावर मिनल कवीश्वर, लेफ्टनंट कर्नल धर्मदत्त गोयल आदी तज्ज्ञांकडून २४ व २५ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी सशुल्क नोंदणी आवश्यक असल्याचेही डॉ.म्हस्के यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com