‘INS Sindhudhwaj’ decommissioned after 35 years of glorious service to the nation
राष्ट्राच्या 35 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर ‘आयएनएस सिंधुध्वज’ सेवामुक्त
नवी दिल्ली : भारतीय नौदलात 35 वर्ष गौरवशाली सेवा बजावण्याऱ्या आयएनएस सिंधुध्वज पाणबुडीला शनिवारी, 16 जुलै 2022 रोजी सेवेतून निरोप देण्यात आला. पूर्व नौदल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल बिस्वजित दासगुप्ता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कमाडोर (निवृत्त) एस पी सिंह यांच्यासह 15 माजी कमांडिंग अधिकारी, कमिशनिंग सीओ आणि 26 कमिशनिंग क्रू आणि मान्यवर या निरोप समारंभाला उपस्थित होते.
या पाणबुडीच्या अग्रभागी करड्या रंगाचा नर्स शार्क दर्शवण्यात आला आहे. नावाचा अर्थ समुद्रातील ध्वजवाहक किंवा अग्रणी असा आहे. नावाप्रमाणेच सिंधुध्वज ही स्वदेशीकरणातील अग्रणी होती. रशियन बनावटीच्या सिंधुघोष श्रेणीतील पाणबुड्यांमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाने केलेल्या प्रयत्नांचे द्योतक सिंधुध्वज होती. स्वदेशी सोनार युएसएचयुएसचे कार्यान्वयन, स्वदेशी उपग्रह संवाद व्यवस्था रुक्मणी आणि एमएसएस जडत्वीय दिशादर्शन प्रणाली आणि पाणसुरूंगांमुळे लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याची स्वदेशी यंत्रणा यासारख्या अनेक बाबींची प्रथम मानकरी सिंधुध्वज ठरली.
खोल समुद्रातील सुटकेसाठीचे जहाज सोबत असलेल्या या पाणबुडीने कार्मिक स्थानांतरण कार्यही यशस्वीरित्या पार पडले. अभिनवतेसाठी असलेला सीएनएस फिरता चषक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पाणबुडीला प्राप्त झाला असून हा मान पटकावणारी ती एकमेव पाणबुडी आहे.
पारंपारिक पद्धतीने सूर्यास्ताच्या वेळी निरोप समारंभ झाला. 35 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर पाणबुडीला सेवेतून मुक्त करण्यासाठी संबंधित ध्वज खाली उतरवण्यात आला त्यावेळी ढगाळ आकाशाने निरोप समारंभाची गंभीरता अधिकच वाढवली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com