Central Govt releases 14th instalment of tax devolution to State governments
कर महसुलातला राज्याच्या वाट्याचा चौदावा हप्ता केंद्र सरकारनं केला राज्यांना सुपूर्द
नवी दिल्ली : कर महसुलातला राज्याच्या वाट्याचा चौदावा हप्ता केंद्र सरकारनं राज्यांना सुपूर्द केला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हलंय की, या पोटी एक लाख ४० हजार ३१८ कोटी रुपये राज्यांना वितरित करण्यात आले आहेत.
राज्य सरकारांना भांडवली आणि विकास खर्च करता यावा याकरता केंद्र सरकार दरवर्षी कर महसुलातला ४१ टक्के वाटा राज्य सरकारांना देतं. चालू आर्थिक वर्षात एप्रिलपासून जानेवारीपर्यंत ६ लाख ६८ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं वितरित केला आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षात आतापर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १३ कोटी ७३ लाख रुपयांवर पोहोचलं आहे जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा सुमारे १७ टक्क्यांनी जास्त आहे.हे कर संकलन एकूण अंदाजपत्रकाच्या अंदाजे ९७ टक्के आहे आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीच्या प्रत्यक्ष करांच्या एकूण सुधारित अंदाजानुसार ८३ टक्क्यांहून अधिक आहे.
केंदिय प्रत्यक्ष कर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने सांगितले की, आत्तापर्यंत एकूण संकलन १६.६८ लाख कोटी आहे जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा २२ टक्क्यांनी जास्त आहे.एप्रिल २०२२ ते १० मार्च २०२३ पर्यंत २.९५ लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यापेक्षा ५९ टक्क्यांनी जास्त आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com