Central Government’s instructions to five states including Maharashtra for necessary measures of Covid-19
कोविड-१९ च्या आवश्यक उपाययोजनांसाठी केंद्र सरकारच्या महाराष्ट्रासह पाच राज्यांना सूचना
नवी दिल्ली : कोविड-१९ च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि देखरेख कायम ठेवावी, अशा सूचना केंद्रसरकारनं महाराष्ट्र,तामीळनाडू, केरळ, तेलंगण, आणि कर्नाटक या राज्यांना दिल्या आहेत.
कोविड रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्र पाठवलं आहे.
आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या विविध सुचनांचं पालन करावं, चाचणी, माग, उपचार, लसीकरण, याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन, पुरेशा चाचण्या आणि रुग्णसंख्या जास्त असलेली ठिकाणं यावर भर कायम ठेवावा, असा सल्ला त्यांनी या पत्रात दिला आहे.
गेल्या तीन महिन्यात भारतात कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट झाली, मात्र गेल्या आठवड्यात १५ हजार ७०८ रुग्णांची नोंद झाली. ही वाढ लक्षणीय आहे.
गेल्या आठवड्यात पॉझिटिव्हीटी दरही वाढला आहे. यात काही राज्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत मिळवलेलं यश न गमावता, जोखीम मूल्यमापनांवर आधारित दृष्टीकोनाचा अवलंब करणं गरजेचं आहे, असं त्यांना म्हटलं आहे.
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोविड-१९ दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ
राज्यात काल सलग दुसऱ्या दिवशी कोविड-१९ च्या १ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. काल १ हजार ४५ नव्या रुग्णांची नोंद झाली, ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ४ हजार ५५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत काल ७०४ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ६७१ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ३३ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून, मुंबईत सध्या ३ हजार ३२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
हडपसर न्युज ब्युरो