इंटरमिजिएट निकाल २० मे, एलिमेंटरी परीक्षेचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार

Intermediate results will be announced on 20th May, Elementary results will be announced on 23rd May

इंटरमिजिएट निकाल २० मे, एलिमेंटरी परीक्षेचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार

शासकीय रेखाकला परीक्षा – २०२१

मुंबई  : कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2021 शालेय स्तरावर दिनांक 9 एप्रिल  ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी करिता अनुक्रमे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचे आयोजन करण्यात आले.

इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दिनांक 20 मे 2022 व एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दिनांक 23 मे 2022 रोजी www.doa.maharashtra.gov.in त्याचप्रमाणे https://dge.doamh.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहेत.

या दोन्ही परीक्षा मिळून वर्ष 2021 मध्ये एलिमेंटरीसाठी 1 लाख 2 हजार 818 व इंटरमिजिएटसाठी 1 लाख 11 हजार 170 असे एकूण 2 लाख 13 हजार 988  परीक्षार्थ्यांनी नावे नोंदविलेली होती. एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेचा निकाल अनुक्रमे 96.15 % व 94.65% इतका लागला आहे, अशी माहिती कला संचालनालयाचे प्र.कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *