Inauguration of the International Conference in Physics Department of the University
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात पदार्थविज्ञान या विषयावरील ‘ ॲडवान्स मटेरियल सिंथेसिस कॅरक्टरायझेशन अँड ॲप्लिकेशन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे उद्घाटन नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी चे संचालक प्रा. वेणुगोपाल आचंटा यांच्या उपस्थितीत झाले. ही परिषद १८ ते २० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात घेण्यात येत आहे.
या उद्घाटन कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, भौतिकशास्त्र प्रशालेचे संचालक डॉ.सुरेश गोसावी, भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.संदेश जाडकर, या परिषदेचे समन्वयक डॉ.हबीब पठाण, सह-समन्वयक डॉ.शैलेंद्र दहीवले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.वेणुगोपाल आचंटा यांनी यावेळी सध्याच्या ‘एप्लिकेशन्स बेस रिसर्च आणि मटेरियल स्टँडर्डआयजेशन’ या विषयावर भर देत औद्योगिक आणि आरोग्य क्षेत्रातील त्याचे महत्व विशद केले.
डॉ.कारभारी काळे यांनी फोटो वोल्टीक, इलेक्ट्रोनिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, हेल्थ केअर आदी विषयातील पदार्थ विज्ञानावर आपले मत मांडले. तसेच डॉ.संजीव सोनवणे यांनीही शेती आणि खेळ या विषयातील पदार्थ विज्ञानावर भाष्य केले.
कारोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये २५० विद्यार्थी, संशोधकांनी सहभाग घेतला आहे. तर अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी यात आपले निबंध सादर केले. यावेळी पोस्टर प्रेझेंटेशन देखील करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com