Sharad Pawar’s criticism that the issue of Hindutva of rebel MLAs is just an excuse
बंडखोर आमदारांचा हिंदुत्वाचा मुद्दा केवळ निमित्त असल्याचं शरद पवार यांची टीका
मुंबई : गेल्या अडीच वर्ष महाविकास आघाडीनं उत्तम कारभार केला, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, करोनासारख्या राष्ट्रीय संकटावर मात करण्यासाठीही राज्याच्या आरोग्य खात्यानं उत्तम काम केलं आहे, महाविकास आघाडीचा प्रयोग फसला आहे, असं म्हणणं म्हणजे राजकीय अज्ञान आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
राज्याच्या बाहेर गेलेले हे नेते राज्यात परत आपल्यावर आपल्याला कोणत्या परिस्थितीत राज्याबाहेर नेलं याबाबतची वस्तुस्थिती लोकांसमोर मांडतील, आपण शिवसेनेसोबतच असल्याचं स्पष्ट करतील, आणि त्यावेळी कुणाकडे बहुमत आहे हे देखील सिद्ध होईल असं ते म्हणाले.
सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे, तिथे बहुमताची चाचणी झाल्यावर सरकार बहुमतात असल्याचंही स्पष्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांची एक चित्रफित आपण दूरचित्रवाणीवर पाहिली, त्यात ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं ते म्हणाले. सीपीएम, सीपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी हे राष्ट्रीय पक्ष त्यांना पाठिंबा देणारे नाहीत, तेव्हा तो पक्ष कोण याबाबत सांगायची गरज नाही, सूरत आणि आसामला जे लोक व्यवस्था करणारे दिसले ते माझ्या परिचयाचे आहेत, आणि त्यात भाजपाचे सदस्य होते असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीसोबत अडीच वर्ष सत्ता उपभोगलेल्या बंडखोर आमदारांचा हिंदुत्वाचा मुद्दा केवळ निमित्त असल्याची टीका त्यांनी केली.
संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना आज केलेलं आवाहन, हे या बंडखोर नेत्यांनी आसाममध्ये बसून नाही, तर प्रत्यक्ष समोर येऊन आपली तक्रार मांडण्याबाबतचं होतं असं ते म्हणाले. हे आमदार बाहेर जाण्याच्या माहितीबद्दल गुप्तचर यंत्रणांच्या यश अपयशाबद्दल चर्चा करण्याची ही वेळ नाही, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांना न्याय मिळायला हवा- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
केंद्रात सत्तेत असलेली पैसा आणि बाहुबल आणि माफियांचा वापर करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र एक दिवस तुम्हाला पायउतार व्हावं लागेल, भाजपाही फुटेल असं त्यांनी म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com