पर्यावरण संरक्षणासाठी सर्व देशांनी एकत्र येणं गरजेचं

Raksha Mantri-Rajnath Singh हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Defense Minister’s appeal that it is necessary for all countries to come together for environmental protection

पर्यावरण संरक्षणासाठी सर्व देशांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसंच व्यापक असमानते विरुध्द लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित भारत प्रशांत क्षेत्रीय संवाद २०२२ या कार्यक्रमात बोलत होते.

Raksha Mantri-Rajnath Singh हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

भारत मुक्त आणि नियमाधारित हिंद प्रशांत क्षेत्रासाठी वचनबद्ध असून ते केवळ हिंद प्रशांत क्षेत्राच्याच नव्हे तर व्यापकरित्या जागतिक समुदायाच्या आर्थिक प्रगतीकरता अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 25 नोव्हेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या हिंद-प्रशांत क्षेत्रीय संवादादरम्यान (IPRD) बीजभाषण करताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2018 मध्ये सिंगापूर येथे शांग्री-ला संवादादरम्यान केलेल्या विधानाचा उल्लेख करून राजनाथ सिंह यांनी हिंद प्रशांत क्षेत्रा विषयीच्या भारताच्या दृष्टीवर प्रकाश टाकला.

मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी भारत वचनबद्ध आहे, जो प्रगती आणि समृद्धीसाठी सुरु असलेल्या एकत्रित प्रयत्नांचा एक भाग आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. असा उल्लेख राजनाथ सिंह यांनी केला. संरक्षण मंत्र्यांनी या प्रदेशातील आसियान देशांच्या मध्यवर्ती भूमिकेची कल्पना मांडली आणि समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी आपल्याला संवादाद्वारे, एक समान तसेच नियम-आधारित क्रम विकसित करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

विनाशकारी युध्द आणि संघर्षाची पर्वा न करता सर्व देशांनी एकत्रीतपणे या समस्यांचा सामना करायला हवा, असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, बाली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या युगाचा अस्त झाल्याचं म्हटलं होतं.

प्रधानमंत्र्यांच्या या संदेशाचं सर्व देशाच्या नेत्यांनी स्वागत केलं. सामुहिक सुरक्षेचा मापदंड बदलण्याची गरज सिंग यांनी व्यक्त केली. जगाच्या आर्थिक स्थैर्यासाठी भारत – प्रशांत क्षेत्राचा विकास होणं गरजेचं आहे.

विभिन्न देशातल्या सागरी मार्गांमुळे व्यापार वाढीला चालना मिळाली असल्याचं ते म्हणाले. भारत- प्रशांत क्षेत्रात आसियानची मध्यवर्ती भूमिका स्वागतार्ह आहे. बहुपक्षीय नितीचं ध्येय वर्तालाप करुनच साध्य होईल, यावर त्यांनी जोर दिला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *