आदिवासी बांधवांना मूळ प्रवाहात आणणे गरजेचे : आमदार चेतन तुपे

Hadapsar Vidhan Sabha MLA Chetan Tupe and Hon.Corporator Sanjay Shinde हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे व स्वीकृत मा.नगरसेवक संजय शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

It is necessary to bring the tribal brothers into the mainstream: MLA Chetan Tupe

आदिवासी बांधवांना मूळ प्रवाहात आणणे गरजेचे : आमदार चेतन तुपे

हडपसर : ससाणेनगर येथील सावली फाऊंडेशन सभागृह येथे ९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आला होते.Hadapsar Vidhan Sabha MLA Chetan Tupe and Hon.Corporator Sanjay Shinde हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे व स्वीकृत मा.नगरसेवक संजय शिंदे हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

कार्यक्रमाला हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे व स्वीकृत मा.नगरसेवक संजय शिंदे, युवा नेते सतीश भाऊ जगताप तसेच आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी आमदार चेतन तुपे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी क्रांतिकारक व त्यांचे कार्य याविषयी माहिती दिली.

आदिवासी संस्कृती ही मूळची संस्कृती असून या देशाचे ते मूळमालक आहेत. आदिवासी समाजातील असणारे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मी स्वतः पुढे येईल तसेच ९ ऑगस्ट दिवशी जागतिक आदिवासी दिन म्हणून शासकीय सुट्टी मिळावी यासाठी विधानसभेचे  उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांना पण निवेदन देऊन व चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

आज महाराष्ट्रमध्ये एकूण ४६ जमाती आहेत देशामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जमाती असून या सर्वांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपावी. असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, जननायक बिरसा मुंडा, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या  प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. आदिवासी संस्कृती जल , जंगल ,जमीन यावर आधारलेली असल्यामुळे मान्यवरांना वृक्षवाटिक देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. कुंडलिक केदारी यांनी आदिवासी समाजातील मुलं आणि मुलींनी त्यांच्याकडे कला आहे त्यांनी कलेमध्ये आपलं नैपुण्य प्राप्त करावे, तसेच त्यांनी काढलेल्या चित्रपट ,शॉर्ट फिल्म , पेसा कायदा, पाचवी अनुसूची , आदिवासी संस्कृती परंपरा या विषयी मत व्यक्त केले.

प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी  सर्वांनी आदिवासी संस्कृती जपावी. एकीची भावना असावी तरुणांनी उच्च शिक्षित व्हावे. जल , जमीन , जंगल ही आपली  पारंपरिक संपत्ती जपावी. याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रल्हाद सिडाम  , मारुती नाना सांगडे पु.म.न., प्रकाश सूर्यवंशी, महेंद्र भोये, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आदिवासी गायक शरद टिपे यांचे संगीतमय मंत्रमुग्ध करणारे आदिवासी गीतांचा कार्यक्रम  सादर करण्यात आला.  कार्यक्रमचे आयोजन आदिवासी उत्सव समिती पूर्व पुणे व आदिवासी युवा मंच हडपसर यांनी  केला होता.

कार्यक्रमासाठी अनिल तिटकारे ,पुनाजी दिवटे, अजय आत्रम ,पंढरी वरखडे, कैलास सरोदे, मधुकर सातपुते, उल्हास बोऱ्हाडे, मधुकर सातपुते, अविनाश मुंडे ,विजय गंभीरे ,सिंधू गारे ,गणपत ठोकळ , व आदिवासी बंधू व भगिनीं , विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना सखाराम गवारी यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी मोरमारे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी  सर्वांचे आभार दाभाडे सर यांनी व्यक्त केले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *