पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार West Bengal Governor Jagdeep Dhankhar is BJP's Vice Presidential candidate हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

West Bengal Governor Jagdeep Dhankhar is BJP’s Vice Presidential candidate

भाजपने पश्चिम बंगालचे राज्यपाल  जगदीप धनखड  यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले

नवी दिल्ली : भाजपने आज पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भाजप आणि एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही घोषणा केली.पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार  West Bengal Governor Jagdeep Dhankhar is BJP's Vice Presidential candidate हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली येथे झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना श्री. नड्डा म्हणाले, श्री धनखड यांचा जन्म राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यात एका अत्यंत विनम्र कुटुंबात झाला. ते म्हणाले, श्री. धनखड यांनी सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वी यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

1989 च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. 1990 मध्ये त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही काम केले.

1993 मध्ये ते अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून राजस्थान विधानसभेवर निवडून आले. जुलै 2019 मध्ये, त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली, जिथे त्यांनी लोककल्याणाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकून लोकांचे राज्यपाल म्हणून ठसा उमटवला.

जगदीप धनखड यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. पहिल्या पिढीतील व्यावसायिक असूनही, ते राजस्थानमधील आघाडीच्या वकिलांपैकी एक बनले. श्री धनखड यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *