For the 2 Test matches against Australia, K. L. Rahul was removed from the post of vice-captain
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांसाठी के. एल. राहुलला उप कर्णधारपदावरुन हटवलं
उनाडकटचे जवळपास 10 वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेचे उर्वरित दोन कसोटी सामने आणि त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय संघाची घोषणा केली आहे.
पहिले दोन कसोटी सामने खेळलेल्या सर्व खेळाडूंना कसोटी संघात कायम ठेवलं आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद कायम ठेवलं असून अपेक्षित कामगिरी न करू शकलेल्या के. एल. राहुलचं उप कर्णधारपद मात्र काढून घेतलं आहे.
या संघात रोहित शर्मा, के. एल. राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, के. एस. भरत, इशान किशन , रविचन्द्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, आणि जयदेव उनाडकट या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संदिग्ध असलेला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. बुमराह अजूनही त्याच्या पाठीच्या दुखापतीतून बरा होत आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळं एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं असून उर्वरित सामन्यांचं कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे.
या संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयर अय्यर, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट या खेळाडूंचा समावेश आहे.
संघाच्या घोषणेचे वैशिष्ट्य म्हणजे उनाडकटचे जवळपास 10 वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज सात सामन्यांमध्ये या फॉरमॅटमध्ये खेळला आहे, शेवटचा सामना नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होता.
एक दिवसीय सामन्यांच्या संघातून के. एल. राहुलला वगळण्यात आलं असून जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे.
भारत 1 मार्च (बुधवार) इंदूर येथे होळकर क्रिकेट स्टेडियमवर तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com