Keep a close eye on diseases like covid-19, influenza, severe respiratory disease
कोविड – १९, इन्फ्लूएन्झा, गंभीर श्वसन रोग यांसारख्या आजारांवर बारकाईनं लक्ष ठेवा
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड – १९, इन्फ्लूएन्झा, गंभीर श्वसन रोग यांसारख्या आजारांवर बारकाईनं लक्ष ठेवा
– केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड – १९, इन्फ्लूएन्झा, गंभीर श्वसन रोग यांसारख्या आजारांच्या नवनव्या कारणांवर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. कोविड-१९ आणि इन्फ्लुएंझा या दोन्ही आजारांमध्ये संसर्गाची माध्यमं, अधिक लोकसंख्येला संसर्गाची असणारी जोखीम, क्लिनिकल लक्षण याबाबत समानता आहे.
गर्दीची आणि कोंदट ठिकाणं टाळणं, खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणं, सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, हात वारंवार धुणं यांसारख्या साध्या उपायांनी सुद्धा हे आजार टाळता येऊ शकतात, असं आरोग्य मंत्रालयानं आपल्या आरोग्य सूचनांमध्ये म्हटलं आहे.
तसंच लोकांमध्ये या आजारांविषयीची जनजागृती केल्यानंच या आजाराच्या संक्रमणाचा धोका कमी करता येऊ शकतो यावर आरोग्य मंत्रालयानं भर दिला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com