Audience preference, growing response to ‘Kerala Story’
केरला स्टोरी’ ला प्रेक्षकांची पसंती, वाढता प्रतिसाद
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत
केरला स्टोरी’ वस्तुस्थितीवर आधारलेला असून तिथल्या नागरिकांच दहशतवादापासून रक्षण करण्याची वेळ आली आहे – मंत्री अनुराग सिंह
द केरळ स्टोरी – राजकारणाने प्रेरित आणि प्रोपोगंडावाला सिनेमा असं ही काहींचं मत
नवी दिल्ली : द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालाय. अनेक वादांनंतर शेवटी चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे लोकांचा जबरदस्त असा प्रतिसाद हा चित्रपटाला मिळताना दिसतोय. लोक चित्रपटाचा सपोर्ट करताना दिसत आहेत.
सिनेमा आज प्रदर्शित झाला असून सिनेमा केरळमधील महिलांचे सक्तीचे धर्मांतर आणि धार्मिक कट्टरतेवर आधारित आहे. हेच सिनेमाच्या वादाचे मुख्य कारण आहे. त्यात दावा करण्यात आला आहे की केरळमध्ये सुमारे ३२ हजार महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आणि त्यातील अनेकांना ISIS शासित सीरियात नेण्यात आले. या दाव्याला एक पक्ष आव्हान देत आहे. याला राजकारणाने प्रेरित आणि प्रोपोगंडावाला सिनेमा म्हणूनही अनेकजण संबोधित करत आहेत.
मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये (ISIS) सामील केलं जात आहे. बेपत्ता झालेल्या मुलींचा आकडा नक्की किती आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचं कथानक खरं असल्याचं काहींचं मत आहे. तर काही मंडळी मात्र हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचं म्हणत आहे.
‘केरला स्टोरी” सारख्या काही चित्रपट अथवा संशोधन साहित्यातून वेगळ्या धाटणीचे किंवा अकथित विषय मांडले जातात तेव्हा काही गट साचेबद्ध पद्धतीने व्यक्त होतात असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह यांनी म्हटलं आहे.
एका ट्विटच्या माध्यमातून ते म्हणाले की काश्मीर फाईल्स’ या जम्मू आणि काश्मीर मधल्या पाकिस्तान पुरस्कृत हिंदू नरसंहारावर आधारित चित्रपटाच्या वेळीही अशाच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निवडक गटांसाठी निवडक स्वरूपाचं असल्याच ते म्हणाले. ‘केरला स्टोरी’ वस्तुस्थितीवर आधारलेला असून केरळ आणि तिथल्या नागरिकांच दहशतवादापासून रक्षण करण्याची वेळ आली आहे असं सिंह यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com