सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बांबूपासून आकाशदिवा बनविण्याची कार्यशाळा

Savitribai Phule Pune Universiy

Know, Learn and Make Lanterns from Bamboo Workshop Savitribai Phule Pune University: Registration open

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बांबूपासून आकाशदिवा बनविण्याची कार्यशाळा : नावनोंदणी सुरूSavitribai Phule Pune University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स पार्क आणि कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून बांबूपासून आकाशदिवे बनविण्याची कार्यशाळा घेण्यात येत आहे.

विद्यापीठातील बांबू हस्तकला आणि कला केंद्र (भाऊ) येथे शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. इयत्ता चौथीपासून पुढे कोणालाही या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. यासाठी ५५० रुपये शुल्क भरून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी http://event.unipune.ac in/ या लिंक वर जात सीएसइसी या सेक्शन मध्ये जात नोंदणी करावी. नोंदणीसाठी २२ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. याबाबत अधिक माहितीसाठी http://sciencepark.unipune.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *