Konkan and Shiv Sena’s relationship is unbreakable – Aditya Thackeray
कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – आदित्य ठाकरे
कुडाळ: कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट असून कोकणानं शिवसेनेला आणि ठाकरे परिवाराला नेहमीच साथ दिल्याचं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा (Shiv Samvad Yatra) दुसरा टप्पा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये सुरू झाला. त्यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कोकणासाठी विकासाची कामे आपण करत होतो, कोकणाला न्याय मिळत होता. शिवसेनेचा म्हणजेचं कोकणाचा आवाज मोठा होत होता. यावेळी कोकणासाठी केलेली विकास कामं आणि त्यासाठी केलेला पाठपुरावा याचे साक्षीदार समस्त कोकणजन आहेत. कोकण गद्दारांना क्षमा करणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात दोन लोकांचं जम्बो मंत्रीमंडळ आहे. काय चाललंय काही कळत नाही. पण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विकास रखडलाय याकडे दुर्लक्ष करून केवळ विरोधकांना दाबण्यासाठी गेल्या 32 वर्षात पाहिलं नाही. पक्ष फोडा, गद्दारी करा, ज्यांनी राजकिय ओळख दिली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसा. हे कधीही महाराष्ट्रात झालं नाही. असं घाणेरडं राजकारण सुरू आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
चाळीसच्या चाळीस जागांवर निवडणुका घ्या. होऊन जाऊ द्या. सत्य जिंकतेय की सत्ता जिंकतेय होऊन जाऊ द्या, असं आव्हानच शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना आज केलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेची कारवाई म्हणजे शिवसेना संपवण्याचा आणि महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न, रखडलेली विकास कामं याकडे दुर्लक्ष करून केवळ विरोधकांना दाबण्यासाठी राज्यात घाणेरडं राजकारण सुरु असून कोकण गद्दारांना क्षमा करणार नाही असं ते म्हणाले.
शिव संवाद यात्रेच्या(Shiv Samvad Yatra) निमित्तानं आदित्य ठाकरे यांनी आज सावंतवाडी मधल्या शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केलं आणि बंडखोरांवर टीका केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com