Large plane landing test at Kolhapur airport successful
मोठं विमान उतरण्याच्या चाचणीत कोल्हापूर विमानतळ पास
मोठं विमान उतरण्याची चाचणी यशस्वी
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाचा विकास मोठ्या वेगानं सुरु असून मोठी विमानं उतरण्याची चाचणीही कोल्हापूर विमानतळानं पार केली.कोल्हापूर विमानतळाने मंगळवारी नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले.
कोल्हापूर विमानतळ इतिहासातील ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला कारण पहिल्यांदाच 146 आसनी मोठे विमान 22 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर उतरले. आज पर्यंत कोल्हापुरात पहिल्यांदाच उतरलं हे भलं मोठं विमान आहे.
नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यानंतर मंगळवारी कोल्हापूर विमानतळावर 146 आसन क्षमतेचे मोठे विमान उतरले. यामुळे एअरबससारखी मोठी विमाने उतरण्यासाठी कोल्हापूरची धावपट्टी योग्य असल्याचे सिद्ध झाले.
एम्ब्रेर E195-E2 प्रॉफिट हंटर विमान दुपारी 3:20 वाजता उतरले. या विमानाने मुंबईहून टेकऑफ केले होते, कोल्हापूर विमानतळावर उतरणारे हे सर्वात मोठे विमान आहे. या ऐतिहासिक लँडिंगमुळे कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी मोठ्या विमानांसाठी योग्य ठरली आहे.
कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या क्षमतेचे विमान उतरल्याने, कोल्हापूरच्या विकासाचे यानिमित्ताने एक प्रकारे नवे उड्डाणच झाले आहे. एमब्ररर कंपनीचे देशातील सर्वात मोठे विमान असलेले ‘ई-195-ई-2 प्रॉफिट हंटर’ हे ब्राझीलियन बनावटीचे विमान छोट्या विमानतळावर, छोट्या धावपट्टीवर उतरता येते का, याची मंगळवारी कोल्हापूर विमानतळावर चाचणी घेण्यात आली.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यापूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एम्ब्रेर लेगसी 650 जेट इंजिन विमानातून कोल्हापूरला भेट दिली होती.
कोल्हापूर हवाईसेवेने देशातील मेट्रो शहरांशी जोडण्याचा विचार असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल.कोल्हापूरला एव्हिएशन हब बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्रवासी विमानसेवेबरोबर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्टार एअरचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत यांनी सांगितले.या विमानाच्या निमित्ताने नव्या अॅप्रनचाही वापर सुरू करण्यात आला. हे विमान नव्या अॅप्रनवर थांबविण्यात आले.
यामुळे नियमित विमानसेवा विनाअडथळा सुरू राहिली.यानिमित्ताने कोल्हापूर विमानतळावर एकाचवेळी पाच विमाने उभी करता येतील, अशी अॅप्रन व्यवस्था करण्यात आली आहे, त्याचीची चाचणी यशस्वी झाली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com