Today is the last day to file nomination papers for the Himachal Pradesh Assembly Elections
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेच्या ६८ जागांसाठी आतापर्यंत २ हजार ५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
निवडणूक विभागानं ३ हजार ८३१ मतदान केंद्र स्थापन केले आहेत. त्यापैकी ३७८ केंद्र संवेदनशील, तर ९०२ केंद्र अतिसंवेदनशील आहेत.
आज (आज) अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला काँग्रेसने हमीरपूर मतदारसंघासाठी डॉ. पुष्पेंद्र वर्मा यांची उमेदवारी जाहीर केली. डॉ पुष्पेंद्र वर्मा हे राज्याचे माजी उद्योगमंत्री रणजीत सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत.१७ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या ६८ जागांसाठी निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती.
२७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. हिमाचल प्रदेश राज्यात १२ नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. मात्र, मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.
विविध पक्षांच्या उमे्दवारांनी निवडणुकीसाठी प्रचार सुरु केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर केंद्रीय नेत्यांच्या प्रचार सभा सुरु होतील आणि खऱ्या अर्थानं प्रचाराला वेग येईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com