राज्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये व्यापक मोहीम

Minister of State for Home Affairs announces in the Legislative Council to launch a massive campaign in major cities to curb crime in the state.

राज्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये व्यापक मोहीम हाती घेण्याची गृह राज्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा.

मुंबई : राज्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये एक व्यापक मोहीम हाती घेतली जाईल, असं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. विरोधकांनी नियम २६० अन्वये कायदाVidhan Parishad आणि सुव्यवस्थे संदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.

कायदा आणि सुव्यवस्था तसंच  जनतेच्या सुरक्षेला महाविकास आघाडी सरकारचं प्राधान्य असल्याची  ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पोलिसांचं सुसूत्रीकरण आणि बळकटीकरण करण्यावर भर दिल्याचं  त्यांनी सांगितलं.

मात्र त्यांच्या या उत्तरानं  विरोधकांचं समाधान झालं नाही. गृहराज्य मंत्र्यांनी मूळ प्रश्नांना बगल दिल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. विरोधकांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.इयत्ता बारावीच्या परीक्षेची कुठलीही प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.

मुंबईत विलेपार्ले इथल्या एका परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचं  वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग वॉटसअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला होता. या प्रकरणी  गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी आतापर्यंत २६ जणांना अटक केली असून, येत्या ८ दिवसात याप्रकरणी आरोपपत्रं दाखल केलं जाणार आहे, असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. याप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला मिळाला आहे, त्यातल्या शिफारशीनुसार उपाययोजना केल्या जातील, तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

वाळूचोरीला आळा घालण्यासाठी अशा गुन्ह्यातल्या आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई करण्याची सूचना सभापती रामराजे निबांळकर यांनी सभागृहाला केली, त्यासाठी मोक्का कायद्यात सुधारणा करण्याबाबत विचार केला जाईल, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या भाषणानं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात झाली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *