“अभया-सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल” प्रकल्पाची सुरवात

Pune Municipal Corporation Logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Launch of “Abhaya-Sanitary Waste Disposal” project

“अभया-सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल” प्रकल्पाची सुरवात

पुणे महानगरपालिका, पॅड केअर, जनवानी संस्था व कमिन्स इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अभया-सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल” प्रकल्पाची सुरवात.

पुणे : पुणे महानगरपालिका, पॅड केअर, जनवानी संस्था व कमिन्स इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने, “अभया – सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल” प्रकल्पाची सुरुवात, हुतात्मा बालवीर शिरीशकुमार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याठिकाणी उदघाटन कार्यक्रमाने झाली. Pune Municipal Corporation Logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागप्रमुख श्रीमती. आशा राऊत, शिक्षण अधिकारी (प्राथमिक विभाग) श्रीमती. मिनाक्षी राऊत, शिक्षण अधिकारी (माध्यमिक विभाग) श्री. पोपट काळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, कमिन्स इंडिया फौंडेशचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. दिपाली खोडे, वरीष्ठ महाव्यवस्थापक- श्री. अमित लेले, सी. एस. आर. हेड श्रीमती. सौजन्या वेगुरू, पॅड केअर कंपनीचे श्री. अजिंक्य धारिया, जनवाणी संस्थेचे श्री. मंगेश क्षिरसागर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. कांबळे व श्रीमती. खरात, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मेमाणे (प्राथमिक) व श्रीमती जाधव (माध्यमिक) व शाळेतील विद्यार्थिनींच्या उपस्थितीत हा उदघाटन समारंभ पार पडला.

श्रीमती. आशा राऊत, श्रीमती. मिनाक्षी राऊत,डॉ. दिपाली खोडे, श्रीमती. सौजन्या वेगुरू यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. ग्रामीण भागात अजूनही सॅनिटरी पॅड वापरण्याचे प्रमाण कमी आहे, तर शहरी भागात सॅनिटरी पॅडचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सुविधा अपुऱ्या आहेत. यासाठी पुणे महानगरपालिका, पॅड केअर,कमिन्स इंडिया, जनवाणी यांच्या संयमाने ‘अभया’ – सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल प्रकल्प इतर 40 महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळेतील मुलींना सॅनिटरी पॅड टाकून देण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजल शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाने डिस्पोजल बिन मध्ये टाकून दिलेल्या सॅनिटरी पॅडवर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून इतर उपयोगी गोष्टी तयार करण्यात येतील.

कार्यक्रमाच्या वेळी श्री. अमित लेले व श्री. अजिंक्य धारिया यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केले. आपल्या कुटुंबासमवेत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत न लाजता मासिक पाळीबद्दल सकारात्मक चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. हा उपक्रम नक्कीच किशोरी मुलींना एक प्लॅटफॉर्म तयार करून देईल जिथे ‘अभया’ने त्यांना आपली मते, प्रश्न मांडता येतील. यामुळे मासिक पाळी बद्दल असणाऱ्या चुकीच्या संकल्पना, गैरसमज, न्यूनगंड दूर होण्यास देखील मदत होईल.

लैगिंक शिक्षणाच्या संदर्भात किशोर- किशोरींमध्ये जनजागृती करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे. यातूनच भावी पिढीला उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य लाभेल असे मत सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात मांडले.

कार्यक्रमाचे सूत्र-संचालन शिक्षक श्री. राठी सर यांनी केले व कमिन्स इंडियाचे श्रीमती. वृंदा देसाई यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *