Recommend that all countries enact laws to make international trade paperless
आंतरराष्ट्रीय व्यापार कागदविरहीत करण्यासाठी कायदे करण्याची शिफारस
आंतरराष्ट्रीय व्यापार कागदविरहीत करण्यासाठी सर्व देशांनी कायदे करण्याची जी २० बैठकीत तज्ञांची शिफारस
मुंबईत जी २० बैठकीत व्यापार वित्तपुरवठा सहकार्यावर चर्चा
विकासात व्यापाराची भूमिका अधोरेखित आणि एकात्मिक व्यापारी वित्तपुरवठा करण्याचा सर्वांनी केला पुरस्कार
मुंबई : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 28 मार्च 2023 रोजी मुंबईत वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे जी20 सदस्य देशांमधील ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.
मुंबईत होत असलेल्या जी-20 व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या (TIWG) पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, इसीजीसी लिमिटेड आणि इंडिया एक्सीम बँकेने संयुक्तपणे परिषदेचे आयोजन केले होते.
आंतरराष्ट्रीय व्यापार कागदविरहीत पद्धतीनं करण्यासाठी सर्व देशांनी कायदे करावे अशी शिफारस आज मुंबईत झालेल्या व्यापार वित्त विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध तज्ञांनी केली. जी २० च्या अंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक कार्यसमुहाच्या बैठकीअंतर्गत या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात ही शिफारस करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात, जागतिक व्यापाराच्या अस्थिर परिस्थितीत, व्यापार आणि वित्तपुरवठ्यातील आव्हानांची नोंद घेणे आणि तफावत कमी करण्यात, बँका, वित्तीय संस्था, विकासविषयक वित्तीय पुरवठा संस्था आणि निर्यात हमी संस्था, अशा सगळ्या संस्थांची भूमिका यावर चर्चा झाली.
आंतरराष्ट्रीय व्यापार डिजिटल केला तर व्यापाराचा खर्च कमी होईल आणि त्यासाठीच्या अर्थसहाय्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील, असं मत या परिषदेत सहभागी झालेल्या तज्ञांनी नोंदवलं. उद्घाटनपर भाषणात केंद्रीय वाणिज्य सचिव सुनिल बर्थवाल यांनी व्यापारासाठीच्या वित्त पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी आणि त्या सोडवण्याच्या पर्यायांवर चर्चा करण्याचं आवाहन केलं.
व्यापाराला होणाऱ्या अर्थपुरवठ्यातली तूट वाढत आहे. आशियायी विकास बँकेच्या अंदाजानुसार ही तूट २ लाख डॉलरपर्यंत गेली आहे. आता तूट कमी करण्याची ही वेळ असल्याचं ते म्हणाले.
या परिषदेनंतर बैठकीसाठी आलेल्या विविध देशातल्या प्रतिनिधींनी वांद्रे कुर्ला संकुलातल्या हिरे प्रक्रिया केंद्राला भेट दिली. भारत डायमंड बोर्सकडून जगातल्या ५२ देशांमध्ये पैलू पाडलेल्या हिऱ्यांची निर्यात केली जाते आणि देशातल्या एकूण हिरे निर्यातीत त्यांचा वाटा ९८ टक्क्यांहून अधिक आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात या केंद्रातून २४ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती अशी माहिती बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता यांनी यावेळी दिली. हिऱ्यांशिवाय एमराल्ड आणि टांझानाईटला पैलू पाडण्यातही भारत आघाडीवर असल्याची माहिती मौल्यवान धातू आणि ज्लेलरी निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष विपुल शहा यांनी दिली. संध्याकाळी हे प्रतिनिधी गेट वे ऑफ इंडियाला भेट देणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com