शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक

Learn, Organize and Struggle is still relevant today: Governor Bhagat Singh Koshyari

शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मान्यवरांचे महामानवास अभिवादन

मुंबई  : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासह मान्यवरांनी चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्याGovernor Bhagat Singh Koshyari हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News. Hadapsar News. अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले असे सांगून त्यांनी दिलेली शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण समाजाला संविधानाच्या माध्यमातून समतेच्या सूत्रात गोवण्याचे काम केल्याचे  राज्यपालांनी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाच्या कामासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अनमोल आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांचे विचार लागू पडतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जतन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासनदेखील प्रयत्नशील आहे. .

चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. भिक्खू संघास मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चिवरदानाचे वितरण करण्यात आले. तसेच संगीत कला अकादमीतर्फे भीमगीतांचे सादरीकरण करण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, मान्यवरांनी या प्रदर्शन दालनास भेट दिली. या प्रदर्शनात मराठी व इंग्रजी कॉफी टेबल बुक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच बार्टीतर्फे विविध योजनांच्या माहितीचा स्टॉलदेखील लावण्यात आला आहे.

Hadapsar Latest News.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *