Lecture by Dr. Abhay Tilak at Center for Intersystems Studies
वानवा कश्याची? रोजगाराची की रोजगार क्षमतेची? या विषयावर व्याख्यान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरप्रणाली अभ्यास केंद्रात डॉ.अभय टिळक यांचे व्याख्यान
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरप्रणाली अभ्यास केंद्रात दरवर्षी लाभसेटवार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ.अभय टिळक यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले असल्याचे आंतरप्रणाली अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ.राजेश्वरी देशपांडे यांनी सांगितले.
‘ वानवा कश्याची? रोजगाराची की रोजगार क्षमतेची? या विषयावर राज्यशास्त्र विभागातील वर्ग खोली एक मध्ये दुपारी तीन वाजता हे व्याख्यान होईल.
डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिका आणि आंतरप्रणाली अभ्यास केंद्र, (सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार व्याख्यानमालेंतर्गत हे व्याख्यान घेण्यात येणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com