Chief Minister Eknath Shinde will be given a legal fight against Shiv Sena for ousting him from the post of Shiv Sena leader – Deepak Kesarkar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी प्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार- दीपक केसरकर
गोवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मागे घेतला नाही, तर ते या निर्णयाला कायदेशीर आव्हान देतील, असे शिवसेनेच्या एका बंडखोर आमदाराने शनिवारी सांगितले.
शिवसेनेच्या विरोधात जाण्यासाठी नव्हे तर अन्यायाविरोधात जाण्यासाठी बंडाचं पाऊल शिंदे गटानं उचललं असून आजही शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपल्या गटाला प्रचंड आदर असल्याचं केसरकर यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं असून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं, हे लोकशाहीला शोभणारं नाही असंही केसरकर म्हणाले.
शिंदे यांनी पक्षाचे सदस्यत्व “स्वेच्छेने” सोडले होते, त्यामुळे “शिवसेना पक्षाध्यक्ष या नात्याने माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेतेपदावरून हटवतो” असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
“सर्व निवडून आलेल्या आमदारांनी शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या विधानसभेच्या गटनेतेपदावरून हटवण्यालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आम्ही ठाकरे यांना कायदेशीर उत्तर देऊ,” असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आता विधानसभेचे नेते आहेत.
“आम्ही उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे ठरवले आहे. ते आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो,” असे सावंतवाडीचे आमदार म्हणाले.
रविवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिंदे गट आज रात्री मुंबईत परतण्याची शक्यता आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com