Letter of Internship Awarded to B.Voc Students at Skill Development Center of Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्रातील बी. व्होक च्या विध्यार्थ्यांना लेटर ऑफ इंटर्नशिप प्रदान
विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातील बी. व्होक च्या विध्यार्थ्यांना मारुती सुझुकी कंपनीतर्फे विद्यावेतन मिळणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी. व्होक मधील रिटेल मॅनेजमेंट च्या २९ विध्यार्थ्यांना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांच्या हस्ते लेटर ऑफ इंटर्नशिप प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. राधाकृष्ण पंडित, प्राध्यापक व अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रवी आहुजा, डॉ. धनंजय मुंडे, रितु छाब्रा तसेच मारुती सुझुकी समूहाचे गुडगाव, हरियाणा येथील व्यवस्थापक योगेश श्रीवास्तव, अंकुर डिगरा, सुशील वैद्य आणि पुण्यातील मारुती सुझुकी समूहाचे एकूण १६ वितरक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत चालविल्या जाणाऱ्या ह्या अभ्यासक्रमामुळे विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून यामार्फत स्वावलंबी बनत त्यांना अर्थार्जनाची संधीही प्राप्त होत आहे. भविष्यात यामध्ये विविध उद्योग समूहासोबत सामंजस्य करार करून याचा विस्तार करण्यात येईल असे रवींद्र शिंगणापूरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. राधाकृष्ण पंडित म्हणाले कि, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी व स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमास प्राधान्य देऊन स्वतःचा पर्यायाने समाजाचा व देशाचा विकास करण्यास हातभार लागेल आणि विद्यार्थी स्वावलंबी होईल.आज लेटर ऑफ इंटर्नशिप प्रदान झालेल्या सर्व विध्यार्थ्यांना प्रत्येकी रु ९००० विद्यावेतन मारुती सुझुकी उद्योग समूहाकडून मिळणार आहे. तसेच पुढे डॉ. पंडित म्हणाले कि, समाजातील गरीब विध्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराक्षम बनविण्यासाठी बँकॉक येथील एक नामवंत इंडस्ट्रीसोबत विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचा सामंजस्य करार लवकरच होणार आहे.
हे ही अवश्य वाचा
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील उमेदवारांनी भाग घेण्याचे आवाहन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड सोबत सामंजस्य करार करत नवीन बी. व्होक रिटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम २०२१ – २२ पासून सुरु केला आहे. यावर्षी या अभ्यासक्रमामार्फत दुसऱ्या बॅचला लेटर ऑफ इंटर्नशिप प्रदान झाल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष काम करत शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे, मा. कुलगुरु, मा. कुलसचिव यांचे सहकार्य नेहमी लाभते. यासाठी संचालक डॉ. पंडित यांनी त्यांचे आभार यावेळी व्यक्त केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com