मार्च २०२३ पर्यंत पॅनकार्डचं आधारशी संलग्नीकरण अनिवार्य

Linking of PAN card with Aadhaar is mandatory पॅनकार्डचं आधारशी संलग्नीकरण अनिवार्य हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Linking of PAN card with Aadhaar is mandatory till March 2023

मार्च २०२३ पर्यंत पॅनकार्डचं आधारशी संलग्नीकरण अनिवार्य

नवी दिल्ली : मार्च २०२३ पर्यंत पॅनकार्डचं आधार ओळखपत्राशी संलग्नीकरण करणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं स्पष्ट केलं आहे. जे पॅनकार्ड आधारकार्डाशी जोडले जाणार नाहीत ते ३१ मार्चनंतर निष्क्रीय होतील असा इशाराही प्राप्तीकर विभागानं दिला आहे.Linking of PAN card with Aadhaar is mandatory
पॅनकार्डचं आधारशी संलग्नीकरण अनिवार्य
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

अद्याप पॅन-आधार लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करा. कारण ही तुमची शेवटची संधी असू शकते. यानंतर पॅन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली जाणार नाही.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN Card -Aadhaar Card link) करणे खूप महत्वाचे आहे. पण अद्याप अनेक लोकांनी ते लिंक केलेले नाही. मात्र, आता दंड भरून लिंक करण्याची सुविधा सरकारने दिली आहे. आयकर विभागाने ( income tax department) पॅन-आधार लिंकिंग कालावधी मार्च 2023 पर्यंत ठेवला आहे. पण पॅन-आधार लिंक करणे मोफत नाही. यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.

पॅनकार्ड निष्क्रीय झाल्यास अशी व्यक्ती प्राप्तीकर दाखल करु शकणार नाही, प्राप्तीकराचा परतावा अश्या व्यक्तीला मिळणार नाही आणि त्याला सुधारित विवरणपत्रदेखील दाखल करता येणार नाही, शिवाय अधिक दरानं अश्या व्यक्तीच्या उत्पन्नावर करकपात केली जाणार आहे. आणि जिथे पॅनकार्ड अनिवार्य असेल अश्या आर्थिक व्यवहारांमध्ये ही अडचण येणार आहे.

31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड लिंक न केल्यास ते रद्द मानले जाईल. याचा अर्थ तुम्ही ते कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात पुन्हा वापरू शकणार नाही. आयटी रिटर्न भरण्यापासून ते रिफंड जारी करण्यापर्यंत तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. तसेच बँकिंग आणि इतर कामे करू शकणार नाहीत. .

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *