Category wise list of successful candidates for verification of documents published on the MHADA website
म्हाडाच्या संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीची संवर्गनिहाय यादी प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण सरळ सेवा भरती २०२१ अंतर्गत घेतल्या गेलेल्या ऑनलाईन परीक्षेतल्या यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीची संवर्गनिहाय यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. MHADA Recruitment 2021, Candidates List For Documents Verification
https://www.mhada.gov.in/en/content/mhada-recruitment-2021-candidates-list-documents-verification
या परीक्षेसाठीच्या कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी येत्या मंगळवारी १४ तारखेपासून १७ जून पर्यंत म्हाडाच्या वांद्रे इथल्या मुख्यालयात होणार आहे.
या पडतळणीसाठी संबंधित उमेदवारांनी उपस्थित रहावं असं आवाहन म्हाडा प्रशासनानं केलं आहे. या यादीतले जे उमेदवार १४ आणि १५ जुनला होत असलेल्या रेल्वे भरतीची परीक्षा देत आहेत, त्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी १६ आणि १७ जूनला उपस्थीत राहता येईल असं म्हाडा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
हडपसर न्युज ब्युरो