पुणे जिल्ह्याचे साहित्यिक व भाषिक योगदान या विषयावर विद्यापीठात व्याख्यान

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Lecture in University on Literary and Linguistic Contribution of Pune District

पुणे जिल्ह्याचे साहित्यिक व भाषिक योगदान या विषयावर विद्यापीठात व्याख्यान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: मराठी भाषा पंधरवडा

पुणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याचे साहित्यिक व भाषिक योगदान या विषयावर मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक अरविंद पाटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे.

या उपक्रमांतर्गत ३६ जिल्हे ३६ व्याख्याने होणार असून त्यातील पुण्यातील व्याख्यान दिनांक २५ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. या व्याख्यानादरम्यान प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे हे अध्यक्षीय भाषण करतील. तर मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, भाषा संचालक विजया डोनीकर, विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ.प्रभाकर देसाई उपस्थित राहणार आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *