National Lok Adalat organized on 7th May in Taluka and District Courts
तालुका व जिल्हा न्यायालयात ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
पुणे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाने विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ मधील तरतुरदीअंतर्गत जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
धनादेश अनादराची प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोड प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, संपादन प्रकरणे व दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीकरिता ठेवण्यात येणार आहेत.
लोक न्यायालयात सामोपचाराने वाद मिटविण्याची इच्छा असल्यास पक्षकारांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे अथवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे त्वरीत संपर्क साधावा अथवा ८५९१९०३६१२ या क्रमांकावर किंवा dlsapune2@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
One Comment on “तालुका व जिल्हा न्यायालयात ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन”