The second session of the Lok Sabha budget session will begin on Monday
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्रं सोमवार पासून सुरु
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरु होणार आहे. ८ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सत्रात १९ बैठका होणार आहेत. दोन्ही सभागृहाचं कामकाज सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
File Photo
चालू राहिल. यावेळी राज्यसभेला आधीच्या वेळापत्रकापेक्षा १९ तासांचा अतिरिक्त वेळ कामकाजासाठी मिळणार आहे.
दोन्ही सत्रांच्या मध्ये सुमारे महिनाभराची सुट्टी होती. या कालावधीत विविध मंत्रालयं आणि खात्यांच्या अनुदानाच्या मागण्याबाबत संबंधित संसदीय समितीनं आभ्यास केला आहे. राज्य सभेच्या ८ स्थायी समित्यांच्या कामांचा लेखाजोखा अध्यक्ष एम. व्यकंय्या नायडू सोमवारी सभागृहात मांडण्याची शक्यता आहे.
या सत्रात अनेक विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. त्यात वित्त विधेयक २०२२, स्पर्धा दुरुस्ती विधेयक, निवृत्ती वेतन निधी नियंत्रण आणि विकास प्राधिकरण दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय दंत आयोग विधेयक, ऊर्जा संरक्षण विधेयक इत्यादीचा सामावेश आहे.