Lok Sabha Speaker has called an all-party meeting tomorrow ahead of the monsoon session of Parliament
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्यापूर्वी लोकसभा सभापतींनी बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी येत्या सोमवारपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशना पूर्वी उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनामध्ये सदनाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं अशी विनंती ते या बैठकीत करतील.
राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी देखील येत्या रविवारी सदनामध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे.
त्याच दिवशी सरकारनं देखील सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य मिळवण्यासाठी सर्व पक्षीय बैठक आयोजित केली आहे. याच काळात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असल्याने हे अधिवेशन महत्त्वाचे आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक सोमवारी (18 जुलै) तर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 6 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. त्यामुळे हे सत्र महत्वाचं असेल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com