This year’s Lokshahir Anna Bhau Sathe Award for ‘Anna Bhauchi Dardbahri Dastaan’
यंदाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ला’
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावर्षीचा हा पुरस्कार, सुप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार मा.विश्वास पाटील यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ या चरित्र गाथेला जाहीर करण्यात आला असून या पुरस्कारामध्ये रू.५,०००/-चा डिमांड ड्राफ्ट तसेच सन्मानचिन्ह, समता सप्तक, शाल, श्रीफळ इ.चा समावेश आहे.
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.डॉ.भारत सासणे यांच्या शुभहस्ते आणि विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार व व्यवस्थापन परिषद सदस्य मा.राजेश पांडे यांच्या उपस्थितीत ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि.१ ऑगस्ट,२२ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न होणार आहे.
पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ.प्रशांत साठे, प्राचार्य डॉ. गणेश राऊत, डॉ.श्यामा घोणसे, प्रा.विजय रास्ते, डॉ.ज्ञानेश्वर कुंभार, डॉ.गौतम बेंगाळे, डॉ.तानाजी हातेकर आणि डॉ .सुनील भंडगे आदिंनी एकमताने श्री.पाटील यांच्या या ग्रंथाची निवड केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com