Mumbai Police’s lookout notice against suspended Deputy Commissioner of Police Saurabh Tripathi
निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस
गेल्या डिसेंबरपासून त्रिपाठी फरार असून तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्यानं हे पाऊल उचलल्याचं पोलीसांनी सांगितलं. रोकड आणि मौल्यवान वस्तूंची ने-आण करणाऱ्या अंगडीया व्यावसायिकांकडून दरमहा १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार त्रिपाठीविरुद्ध आहे.
तक्रारीनंतर नागराळे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्रिपाठी यांनी हवाला चॅनलद्वारे उत्तर प्रदेशात खंडणीची रक्कम पाठवल्याचा आरोप आहे. तपासासाठी एकूण पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत.
पोलीस आता त्रिपाठीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंगडिया ऑपरेटरकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून पोलिसांनी यापूर्वी तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम, पोलिस उपनिरीक्षक समाधान जमदाडे, ओम वनगटे यांच्यासह अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
हडपसर न्युज ब्युरो