Governor Koshyari participates in Maha Kumbabhishekam of Murugan Temple
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा संपन्न
मुंबई :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छेडानगर चेंबूर येथील श्री सुब्रह्मण्य समाजाच्या तिरुचेंबूर मुरुगन (कार्तिकेय) मंदिरातर्फे 12 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून यज्ञपूजेत भाग घेतला.
यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, श्री सुब्रह्मण्य समाज संस्थेचे सचिव पी.एस. सुब्रमण्यम, मंदिराचे पदाधिकारी, तामिळनाडू येथून महाकुंभाभिषेकासाठी आलेले शिवाचार्य व तंत्री तसेच हजारो भाविक उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांनी कार्तिकेय स्वामी, महागणपती तसेच मंदिरातील इतर देवीदेवतांचे दर्शन घेतले. राज्यपालांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मुंबईतील तामिळ भाषिक लोकांनी स्थापन केलेला ‘श्री सुब्रह्मण्य समाज’ आपल्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. संस्थेतर्फे १९८० साली कला, वास्तुशास्त्र व संस्कृतीचा संगम असलेले ‘तिरुचेंबूर मुरुगन मंदिर’ बांधण्यात आले. दर बारा वर्षांनी मंदिरात महाकुंभाभिषेक केला जातो.
Hadapsar News Bureau.