Mahanirmiti’s record performance by generating 8,018 MW of thermal power
८ हजार १८ मेगावॅट इतकी औष्णिक वीज निर्मिती करुन महानिर्मितीची विक्रमी कामगिरी
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून महानिर्मितीने विक्रमी कामगिरी साध्य केली असून आज आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. आज महानिर्मितीनं सकाळच्या शिखर मागणीच्या सत्रात आपल्या औष्णिक वीज केंद्रांमधून एकूण ८ हजार १८ मेगावॅट इतकी औष्णिक वीज निर्मिती केली.
राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मा. मुख्यमंत्री तसेच मा. ऊर्जा मंत्री, मा.ऊर्जा राज्यमंत्री यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महानिर्मितीनं मिशन ८ हजार मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तत्परतेनं हे लक्ष्य साध्य केलं आहे.
महानिर्मितीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, तसंच सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो