महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या तणावाचा राज्यातल्या विविध पक्षाच्या नेत्यांकडून निषेध

Maharashtra-Karnataka border महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The tension on the Maharashtra-Karnataka border has been protested by various party leaders in the state

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या तणावाचा राज्यातल्या विविध पक्षाच्या नेत्यांकडून निषेध

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी
  • सीमाभागातली परिस्थिती सामान्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ४८ तासांचा मुदत
  • विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात बेळगाव- हिरेबागवाडी इथल्या टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली. त्यात ६ ट्रकचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करुन याबद्दल नाराजी व्यक्त केली. या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं बोम्मई यांनी सांगितलं, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.Maharashtra-Karnataka border महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

सीमाभागातली परिस्थिती सामान्य करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ४८ तासांचा मुदत कर्नाटकला दिली आहे. अन्यथा आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनात बेळगावला जावं लागेल. हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यानी पुढाकार घेतला पाहिजे असं देखील पवार म्हणाले. सीमावादाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशन काळात उपस्थित करावा, अशी सूचना त्यांनी केली.

विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारनं याबाबत कणखर भूमीका घ्यावी, केंद्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कन्नड रक्षक वेदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्यासाठी कोल्हापुरातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह कार्यकर्ते बेळगाव सीमेवर धाव घेतली.

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याने त्यांचा निषेध व्यक्त करत कर्नाटक सीमाभागात शिरण्याचा प्रयत्न केला असताना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *