3rd Maharashtra State Masters Games Championship 2022
३री महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स चॅम्पियनशिप २०२२
मैदानी स्पर्धा, स्विमिंग आणि बास्केटबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघ चॅम्पियन
औरंगाबाद: औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र मास्टर गेम्स स्पर्धेमध्ये मैदानी स्पर्धा, स्विमिंग आणि बास्केटबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघांनी चॅम्पियनशिप मिळवली.यामधील सर्व खेळाडूंचे अभिनंदन व गुण गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल फुरसुंगी या ठिकाणी रविवार दि.८/१/२०२३ रोजी घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री. संजय हरपळे माजी उपसरपंच फुरसुंगी, मा. श्री. महेंद्र बडेकर पोलीस उपनिरिक्षक शिवाजीनगर, मा.श्री.शरद् हरपळे सामाजिक कार्यकर्ते, मास्टर्स गेम्स असोसिएशन पुणे अध्यक्ष सहिंद्र भावले, सचिव श्री महेंद्र बाजारे,उपसचिव संजीव पवार, कार्यध्यक्ष श्री. धनंजय मदने, खजिनदार श्रीमती रेखा आबनावे उपस्थित होते.
८५ वर्षे गटात सुरेश पाटोळे,८० वयोगटात अनिल कुमठेकर,६५ वयोगटात गुरमित सिंग चौहान,५५ वयोगटात महेंद्र बाजारे, बाबू तांबे,५० वयोगटात भाऊसाहेब महाडिक,बापू चेमटे, संतोष मुखनाक, प्रमोद साळुंखे,विजय पेरला,स्मिता मस्तमर्डी, ४५वयोगटा सुहास साळुंखे, रवींद्र नांगरे, माधुरी साळुंखे,४० वयोगटात रुपाली पाटील,३५ वयोगटात धनंजय मदने,राधिका पाटील, प्रकाश टेकाळे,सचिन नाडे, भगवान वाघमारे, जितेंद्र साळुंखे पदके मिळवली. या सर्वांचा प्रमाणपत्र देऊन गुण गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक श्री. महेंद्र बाजारे यांनी करून या खेळाचे महत्व सांगितले.प्रमुख पाहुणे श्री. संजय हरपळे यांनी मनोगतातून या वयातील तुम्ही खेळाडू सहभागी होऊन गोल्ड मेडल मिळवता हे पाहून आम्हालाही प्रेरणा घेण्यासारखे आहे.असे मत मांडले.तर श्री महेंद्र बडेकर पूर्वीच्या व आताच्या खेळातील सरावातील फरक सांगून आपण हे सध्याच्या पिढीला प्रेरणा घेण्यासारखे तुम्ही व तुमच्यातील ३५ ते ८७ वयातील खेळाडू यांकडे पाहून घेतील हीच चालती बोलती प्रेरणा आहे.सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे आभार श्री. जितेंद्र साळुंखे यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती.रेखा आबनावे यांनी केले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com