Organizing the Maharashtra edition of the Technopreneurship Series from April 25
टेक्नोप्रेन्योरशिप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्तीचे 25 एप्रिलपासून आयोजन
पुणे : राज्यात नावीन्यपूर्ण कल्पनांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सिस्को लाँचपॅड यांच्या सहकार्याने भारताच्या टेक्नोप्रेन्योरशिप मालिकेच्या महाराष्ट्र आवृत्तीचे २५ ते २९ एप्रिल आणि २ मे ते ६ मे २०२२ या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे.
या टेक्नोप्रेन्योरशिप मालिकेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तरूण विद्यार्थ्यांसाठी स्टार्ट-अप, व्यवसाय-उद्योजकांसाठी ज्ञान व तंत्रज्ञान आधारित सत्र आयोजित केले जाईल. यामध्ये शीर्ष नवोदित व स्टार्ट-अप्सना त्यांच्या कल्पना संबंधित भागधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार असून ज्ञान सत्र उद्योग व पर्यावरणातील तज्ज्ञांद्वारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमादवारे नवोदित व उद्योजकांना त्यांची कल्पना कशी तयार करावी, टिकवून ठेवावी, विस्तारित करावी व मोठे कसे व्हावे याचे ज्ञान दिले जाईल. तसेच यामध्ये उत्पादन विकास, डिझाइन विचार, तंत्रज्ञान व आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय ज्ञानाचा एक भाग म्हणून निधी कसा उभारावा यासारख्या विस्तृत विषयांचा समावेश आहे.
टेक्नोप्रेन्योरशिप मालिका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता उत्सुक उद्योजक, विद्यार्थी आणि सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्ट-अपचे संस्थापक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असून यासाठीची लिंक https://cs.co/CLAPMaharashtra अशी आहे.
या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक उद्योजक व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो (Hadapsar News Bureau)