Mahavikas Aghadi’s majority will be proved in the Assembly – Sharad Pawar
महाविकास आघाडीचं बहुमत विधानसभेत सिद्ध होईल- शरद पवार
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये बहुमत आहे की नाही हे विधानसभेत सिद्ध होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेतल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. राज्यात या आधी अशी स्थिती आपण अनेकवेळा पाहिली असल्याचं ते म्हणाले. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल. आमदार परतले की वस्तुस्थिती स्पष्ट करतील.
शिंदे यांची एक चित्रफित आपण दूरचित्रवाणीवर पाहिली, त्यात ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं म्हणाले. सी पी एम, सी पी आय, काँग्रेस, आणि अन्य राष्ट्रीय पक्ष त्यांना पाठिंबा देणारे नाहीत, तेव्हा तो पक्ष कोण याबाबत सांगायची गरज नाही, सूरत आणि आसामला जे लोक व्यवस्था करणारे दिसले ते माझ्या परिचयाचे आहेत, आणि त्यात भाजपाचे सदस्य होते, असं पवार सांगितलं.
महाविकास आघाडीसोबत अडीच वर्ष सत्ता उपभोगलेल्या बंडखोर आमदारांचा हिंदुत्वाचा मुद्दा केवळ निमित्त असल्याची टीका पवार यांनी केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com