Uttar Pradesh and Haryana make face masks mandatory in selected districts amid a spike in COVID-19 cases
उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये मुखपट्ट्यांचा वापर अनिवार्य
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्यातल्या ७ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुखपट्टी अनिवार्य करण्यात आली आहे.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्राजवळच्या गौतमबुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मीरत, बागपथ आणि बुलंदशहर या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या सर्व 6 जिल्ह्यांमध्ये आणि राज्याची राजधानी लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य असेल.
जीनोम सिक्वेन्सिंग दरम्यान असे आढळून आले की एनसीआर जवळच्या जिल्ह्यांमधील कोविड संक्रमित लोकांच्या नमुन्यांमध्ये फक्त ओमिक्रॉन प्रकार उपस्थित होता.
हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी हरियाणामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मुखपट्ट्यांचा वापर करणं बंधनकारक करण्याचा निर्णय हरियाणा सरकारनं घेतला आहे.
हे नियम गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत आणि झज्जर या जिल्ह्यांसाठी लागू असतील.राष्ट्रीय राजधानी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या या चार जिल्ह्यांमध्ये मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दंड ठोठावला जाईल अशी माहिती हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी दिली आहे. ते म्हणाले की, हरियाणातील कोविड -19 च्या 238 प्रकरणांपैकी 198 गुरुग्राममधील आणि सुमारे 22 प्रकरणे फरीदाबादमधील आहेत.
Hadapsar News Bureau.