वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांना परवडण्याजोगे बनवण्याला सर्वोच्च प्राधान्य

Infrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Government’s top priority to make medical treatment affordable for the common man – Prime Minister

वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांना परवडण्याजोगे बनवण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य

-प्रधानमंत्री

“आयुष्मान भारत आणि जनऔषधी योजनांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या 1 लाख कोटींहून अधिक रुपयांची बचत झाली”

आरोग्य आणि वैद्यकीय संशोधनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधितInfrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांना परवडण्याजोगे बनवण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना बोलत होते. आरोग्य सेवा किफायतशीर आणि सर्वसमावेशक होण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची असल्यामुळे, आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केल्याचं ते यावेळी म्हणाले.

आरोग्य सेवेकडे कोविडपूर्व आणि कोविडोत्तर महामारी प्रणालीच्या दृष्टीने पाहिले जाऊ शकते असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या महामारीने समृद्ध राष्ट्रांचीही कसोटी पाहिली. जगाचे लक्ष आरोग्यावर केंद्रित झाले, त्यामुळे भारताने एक पाऊल पुढे टाकले आणि आरोग्य देखभालीवर लक्ष केंद्रित केले. “म्हणूनच एक वसुंधरा एक आरोग्य – हा एक दृष्टीकोन आम्ही जगासमोर ठेवला आहे. यामध्ये मानव, प्राणी अथवा वनस्पती, अशी सर्वांसाठी सर्वांगीण आरोग्यसेवा समाविष्ट आहे” असे ते म्हणाले.

आयुष्मान भारत आणि जन औषधी योजनेमुळे गरीब आणि मध्यम वर्गीय जनतेच्या एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशाची बचत झाल्याचं ते म्हणाले. केंद्रसरकारने आरोग्य सेवेला केवळ आरोग्य मंत्रालयापर्यंत सीमित ठेवलं नसून, त्यासाठी ‘संपूर्ण सरकार’ हा दृष्टिकोन ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य सेवेसाठी मजबूत पायाभूत सुविधांचं महत्व अधोरेखित करत ते म्हणाले की, नागरिकांना चाचणी सुविधा आणि प्रथमोपचार सुविधा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी देशभरात नागरी वस्त्यांपासून जवळ दीड लाख आरोग्य सेवा केंद्र उभारण्यात आली आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये देशात २६० पेक्षा जास्त वैद्यकीय महाविद्यालयं सुरु झाली असून, २०१४ नंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा देखील वाढवण्यात आल्याचं ते म्हणाले. डिजिटल हेल्थ ID च्या माध्यमातून नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, 5G सेवेमुळे स्टार्टअप उद्योगांना या क्षेत्रात संधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

एक विकसित आरोग्य आणि निरोगी परिसंस्था भारतात केवळ प्रत्येकाच्या प्रयत्नांनी तयार केली जाऊ शकते. त्याचबरोबर सर्व भागधारकांना त्यांच्या मौल्यवान सूचना देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना केलं. “आम्ही ठोस आराखड्यासह निश्चित केलेल्या उद्दिष्टासाठी वेळेच्या मर्यादेत अर्थसंकल्पातील तरतुदी लागू करायला सक्षम असलं पाहिजे, यावर मोदी यांनी भर दिला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *