काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे

Congress leader Mallikarjun Kharge काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Senior leader Mallikarjun Kharge elected as Congress president

काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे

शशी थरूर यांचा पराभव

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना त्यांनी प्रचंड मताधिक्याने पराभूत केलं. खरगे यांना 7 हजार 897 मतं मिळाली तर थरुर यांना 1 हजार 72 मतं मिळाली . Congress leader Mallikarjun Kharge काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे  हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झाली. परवा (17 ऑक्टोबर) या निवडणुकीसाठीचं मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. 2001 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या.

गेल्या सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 9 हजार 385 मतदारांनी मतदान केलं होतं, अशी माहिती काँग्रेसचे पक्ष निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 416 मतं अवैध ठरली. 25 वर्षानंतर प्रथमच काँग्रेसला गांधी कुटुंबातला सदस्य नसलेला अध्यक्ष मिळाला आहे.

जवळपास 25 वर्षांनंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत जवळपास 95 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

खर्गे कर्नाटकातून राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत आणि 16 फेब्रुवारी 2021पासून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. 2014-19 दरम्यान लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते होते.

माजी रेल्वेमंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द राहिलेली आहे.1972 ते  2014 दरम्यान सलग11 वेळा निवडणुका जिंकण्याचा विक्रम त्यांनी केलाय.

कर्नाटकच्या राजकारणात तर एक मोठा चेहरा म्हणून खर्गे यांना ओळखलं जातं. 2005 साली त्यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि जेडीएसच्या तुलनेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आणि कर्नाटकच्या ग्रामीण भागात काँग्रेसचा बोलबाला झाला. अखेरीस आता खर्गे यांच्या रुपाने काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळाले आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *