A project to manufacture C-295 cargo aircraft with Airbus technology will be set up in Baroda
एअरबसचं तंत्रज्ञान असलेला सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प बडोद्यात उभारणार
राज्य सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याची टीका आदित्य ठाकरेची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही हा प्रकल्प गुजरातला सुरु होणार असल्यावरुन सरकारवर केली टीका
विरोधक टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही करत नाहीत : उद्योग मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली : मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने 8 सप्टेंबर 2021 रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती.
संरक्षण मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2021 रोजी, मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. सोबत संबंधित उपकरणांसह विमान संपादन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.
भारतीय वायू दलासाठी आवश्यक असलेल्या एअरबसचं तंत्रज्ञान असलेल्या सी-२९५ या मालवाहू विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प, गुजरातमध्ये बडोद्यात उभारला जाणार आहे. संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार यांनी काल ही माहिती दिली. .
दरम्यान, २२ हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याच्या घोषणेनंतर शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
वेदांता फॉक्सकॉन प्रक्लप राज्यातून गेल्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रात खेचून आणण्याचं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं होतं. मात्र हा ही प्रकल्प राज्याबाहेर गेला, त्यामुळे राज्य सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही हा प्रकल्प गुजरातला सुरु होणार असल्यावरुन सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, यावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, विरोधक टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही करत नाहीत, असा आरोप केला.
२१ सप्टेंबर २०२१ ला या प्रकल्पाचा केंद्र सरकारने सामंजस्य करार केला होता. त्यामुळे एक वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय कंपनीनं आणि संबंधित यंत्रणांनी घेतला होता, तरीदेखील हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी प्रयत्न करू, असं आपण सांगितलं होतं, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “एअरबसचं तंत्रज्ञान असलेला सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प बडोद्यात उभारणार”