राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाचा फटका

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर Heavy rains in many places in the state हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Many parts of the state were hit by the rain

राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाचा फटका

मुंबई :  राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर बीड, लातूर, औरंगाबाद, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, परभणी या जिल्ह्यांना परतीच्या पावसानं चांगलचं झोडपलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून काही भागातून माघारी फिरेल. मात्र, तोपर्यंत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर Heavy rains in many places in the state हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुण्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे.  मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारीपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते.  तसेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पाणी लागलं आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे. या पावसामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलं आहे.

या पूरसदृश परिस्थितीकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. धरणातून पाणी सोडताना पूर्वसूचना द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होत आहे. फलटण तालुक्यात सोमंथळी इथं ओढ्याला आलेल्या पुरात काल रात्री चारचाकी वाहन वाहून गेल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. जालना शहरातल्या कुंडलिका नदीवरचा रामतीर्थ बंधारा ओसंडून वाहत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सततच्या परतीच्या पावसानं शेतपीकांना मोठा फटका बसला आहे. मका, कापूस, सोयाबीन या पिकांचं नुकसान झालं आहे. आज पहाटे जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.

पैठण तालुक्यात पाचोड इथल्या नदीला पूर आल्यानं पाचोड खुर्दचा संपर्क तुटला. औरंगाबाद शहर आणि परिसरातही मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

सांगली जिल्ह्यात कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे, नद्या आणि ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. जत तालुक्याच्या पूर्व भागात असेलली बोर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर उत्तर भागातल्या कोरडा नदीलाही पूर आला आहे. द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांना मात्र याचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *