मराठी रंगभूमी दिन आज केला जाणार साजरा

Drama -logo

Marathi Theater Day will be celebrated today

मराठी रंगभूमी दिन आज केला जाणार साजरा

मुंबई : मराठी रंगभूमी दिन आज साजरा केला जात आहे. मराठी नाट्य परंपरेचे जनक विष्णूदास भावे यांनी 1843 मध्ये सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सांगलीमध्ये रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. या घटनेचं स्मरण म्हणून दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.Drama -logo

कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची सांगली संस्थानचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धनांनी विष्णूदास भावेंना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भावेंनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले.

१९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते

यानिमित्तानं आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे आज ललित पौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. ललित कला केंद्राच्या अंगणमंचावर रात्री 9 वाजल्यापासून उद्याच्या सुर्योदयापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचं गायन, वादन, नर्तन आणि नाट्यप्रयोगांचं सादरीकरण केलं जाणार आहे. मराठी रंगभूमी दिन आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं हा महोत्सव साजरा होत आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *