Massive violence in Pakistan after the arrest of former Prime Minister Imran Khan
माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात हिंसाचार
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरु झाला आहे. आंदोलकांनी अनेक वाहने आणि घरे जाळली आहे. गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तिथे जाळपोळ आणि लूटमार सुरू झाली असून तेथील भयानक दृश्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीने एका रियल इस्टेट कंपनीकडून त्यांचे ५० अब्ज रुपये कायदेशीर करण्यासाठी कोट्यवधी रुपये लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आल्याचं इस्लामाबाद पोलिसांनी आपल्या निवदेनात म्हटलं आहे.
पाकिस्तानात माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. आंदोलक आणि लष्करात सुरू असलेल्या चकमकीत क्वेट्टामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये झालेल्या हिंसाचारात १५ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
आंदोलकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांनी लाहोरमधल्या लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. रावळपिडींत लष्कराच्या मुख्यालयाचं प्रवेशद्वारही या आंदोलकांनी तोडलं. इम्रान खान यांना काल अटक झाल्यानंतर रावळपिंडी आणि इस्लामाबादच्या अनेक भागात इंटरनेट बंद असून पेशावरमध्ये संचारबंदी लागू आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com