प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर Information and Broadcasting Minister Anurag Thakur हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Media should consider whether the Laxman line is being violated when broadcasting news – Anurag Thakur

प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली : ‘ये आकाशवाणी है’, या चिरकालीन शब्दांना प्रत्येक भारतीय ओळखतो, त्या शब्दांचा प्रतिध्वनी आज आकाशवाणी भवन येथील रंग भवन सभागृहात उमटला. अनुराग ठाकूर यांनी ते शब्द उच्चारले फक्त त्याला- और आज आप सूचना प्रसारण मंत्री को सुन रहे है- हे शब्द जोडून. हे त्यांचे प्रारंभीचे शब्द राष्ट्रीय प्रसारण दिन समारंभाचे उद्घाटन करणारे होते. २३ जुलै 1927 मध्ये आकाशवाणीने आपला मोठा आणि गौरवशाली प्रवास सुरू केला होता.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर Information and Broadcasting Minister Anurag Thakur हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

दूरचित्रवाणी आणि त्यानंतर इंटरनेटच्या आगमनाने रेडिओवर अस्तित्वाचे संकट कोसळणार आहे असे काही लोकांचे मत असताना रेडिओने स्वत:चे श्रोते ओळखले आणि केवळ स्वत:ची प्रासंगिकता, समर्पकताच नाही तर त्याची विश्वासार्हताही राखली, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

जेव्हा लोकांना निःपक्षपाती बातम्या ऐकायच्या असतात तेव्हा ते’ साहजिकच ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या बातम्या ऐकतात, असे त्यांनी पुढे नमूद केले. देशाचा 92 टक्के भूगोल आणि 99 टक्क्यांहून अधिक लोकांपर्यत आकाशवाणी पोहोचते ही एक कौतुकास्पद कामगिरी आहे, असे गौरवोद्गार ठाकूर यांनी काढले.

प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा, असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला आहे. राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त नवी दिल्लीत, प्रसारण भवनात आयोजित कार्यक्रमात काल बोलताना, ठाकूर यांनी, आकाशवाणी आणि दूरदर्शन, श्रोत्यांना विश्वासार्ह बातम्या पुरवत असल्याचं सांगून या माध्यमांची प्रशंसा केली.

खाजगी माध्यमांबद्दल कुठेतरी चुकीची धारणा निर्माण होत असेल, अनेक विषयांवर ‘मीडिया ट्रायल’, घेऊन आपली मते लादली जात असतील तर त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका अनुराग ठाकूर यांनी मांडली.

रॉयटर्स संस्थेच्या अहवालाचा हवाला देऊन ते म्हणाले की आकाशवाणी, ही देशातील सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम संस्था ठरली आहे. रेडियोची व्याप्ती वाढविण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले की कम्युनिटी रेडियो स्थानकांची संख्या, पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत 360 ते 750 पर्यंत वाढविण्यावर भर दिला पाहिजे.

आकाशवाणीनं आपल्य समृद्ध संग्रहाचा व्यवहार्य उपयोग करुन, दर्जेदार कार्यक्रम निर्मिती करावी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचावं असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीत आकाशवाणीनं निभावलेल्या लक्षणीय भूमिकेला ठाकूर यांनी उजाळा दिला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *