Medical device manufacturers are invited to apply for a license on the “accessible portal”
वैद्यकीय उपकरणे उत्पादकांनी परवाना प्राप्त करण्यासाठी “सुगम पोर्टल”वर अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : विभागातील सर्व वैद्यकीय उपकरणे उत्पादकांनी परवाना प्राप्त करण्यासाठी “सुगम पोर्टल” वर अर्ज करुन १ ऑक्टोबर २०२२ पूर्वी परवाना प्राप्त करुन घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
उत्पादकांनी ऑनलाईनरित्या अर्ज www.cdscomdonline.gov.in या संगणक प्रणालीवर वर अर्ज करावे. परवाने प्राप्त करताना अडचणी आल्यास आपल्या जवळच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा. १ ऑक्टोबर २०२२ नंतर ज्या उत्पादकांकडे परवाने नसतील त्यांचेवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व मेडीकल डिव्हाईस नियम २०१७ अन्वये कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.
केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम २०१७ पारित केले असून या नियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. वैद्यकीय उपकरणांचे “अ” “ब” “क” “ड” अशी वर्गवारी केली आहे. “अ” व “ब” या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे तर “क” व “ड” या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे, असे सह आयुक्त एस.बी. पाटील यांनी कळविले आहे.
हडपसर न्युज ब्युरो