National Conference on Medicinal Plants in University
विद्यापीठात औषधी वनस्पतीविषयी राष्ट्रीय परिषद
तज्ज्ञांची हजेरी , परिषदेसाठी पूर्व नोंदणी आवश्यक
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १४ ते १६ मार्च २०२३ दरम्यान ‘वनस्पती विज्ञानातील नवीन प्रजाती आणि औषधी वनस्पती संशोधन’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विविध तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आणि आयुष मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेसाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून यामध्ये सशुल्क प्रवेश घेता येणार आहे. याचवेळी औषधी वनस्पती यांची खरेदी विक्री करणाऱ्यां खरेदीविक्रीदारांचीही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना वनस्पतीशास्त्राचे प्रमुख डॉ. ए.बी.नदाफ यांनी सांगितले की, वनस्पतीशास्त्र विषयातील विविध संशोधन, जैव प्रजातींच्या विषयी मार्गदर्शक तत्वे ठरविणे, यातील बौद्धिक संपदा आणि अधिकार, औषधी वनस्पतींची जपणूक आणि वाढ आदी बाबींवर या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.
या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.भूषण पटवर्धन, जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील डॉ.प्रवीण वर्मा यांच्यासह हरियाणा, बेंगलोर, मोहाली अशा विविध ठिकाणहून अनेक नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यासाठीची अधिक माहिती तसेच नोंदणीसाठीची लिंक विद्यापीठाच्या संकेस्थळावर देण्यात आली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com