The deadline for Merit Scholarships for Students from the Economically Weaker Sections is 31 October 2022
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी मुदत 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत
राष्ट्रीय साधन अधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेतून (MMCMSS) नवीन शिष्यवृत्ती किंवा नूतनीकरणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022
नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती (NMMSS) शिष्यवृत्तीसाठी 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती, नॅशनल मीन्स कम मेरिट शिष्यवृत्ती योजना NMMSS ही आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची आठव्या इयत्तेनंतर होणारी गळती रोखण्याच्या आणि शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दिली जाते.
प्रत्येक वर्षी इयत्ता नववीमधील निवडक मुलांना एक लाख नवीन शिष्यवृत्ती बहाल केल्या जातात तसेच राज्य सरकारी, सरकारी अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती सुरू रहाते. या शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक 12,000 एवढी असते.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजेच NSP हा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठीचा एकात्मिक डिजिटल मंच आहे. त्यावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीची शिष्यवृत्ती योजना ( NMMSS )आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीच्या शिष्यवृत्ती त्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केल्या जातात. ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.
ज्या मुलांच्या पालकांचे सर्व स्रोताकडून मिळणारे उत्पन्न वार्षिक साडेतीन लाखापेक्षा जास्त नसेल ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र आहेत. या शिष्यवृत्तीसाठी असलेल्या निवड परीक्षेला पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना सातवीच्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण किंवा तत्सम श्रेणी असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांमध्ये पाच टक्क्यांची सवलत आहे.)
यासाठी दोन टप्प्यात पडताळणी केली जाते. पहिल्या टप्प्यात संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याकडून (INO) तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्याकडून (DNO) अर्जाची पडताळणी होते. पहिल्या टप्प्यातल्या पडताळणीसाठी (INO-L1)शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 तर दुसऱ्या टप्प्याच्या पडताळणीसाठीची(DNO-L2) तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com