MHT – CET exam will be held in August
MHT – CET परीक्षा ऑगस्टमध्ये होणार
मुंबई : राज्य सरकारनं MHT-CET परीक्षा पुढे ढकलली आहे. यापूर्वी ही परीक्षा जून मध्ये घेण्यात येणार होती. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलंय.
जेईई मेन्स जून-जुलैमध्ये होणार आहे. नीट परीक्षाही जुलैमध्ये होणार आहे. त्यामुळं CET पुढे ढकलण्यात आली असून वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार असल्याचं ते म्हणाले.
हडपसर न्युज ब्युरो (Hadapsar News Bureau)